शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
गतिमान संतुलन
दिलीप कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांविषयी मी याच संकेतस्थळावर लेख लिहिला आहे. “गतिमान संतुलन” या नावाचे नियतकालिक ते चालवतात. पर्यावरण-रक्षण आणि साधी जीवनशैली या विषयीचे त्यांचे अनुभव आणि विचार “गतिमान संतुलन” मधून व्यक्त होतात.
श्री. कुलकर्णींनी माझ्या या संकेतस्थळावर त्यांच्या “गतिमान संतुलन” या अंकाचे इ-रूप लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मला परवानगी दिली आहे. वाचकांनी “गतिमान संतुलन”चा हा अंक डाउनलोड करून (गतिमान संतुलन डाउनलोड करा – राइट क्लिक करून Save Link As यावर क्लिक करा.) जरूर वाचावा. आणि या अंकाचे वर्गणीदारही व्हावे अशी कळकळीची विनंती करीत आहे. वार्षिक वर्गणी ३० रु. आहे. एकाच वर्षाची वर्गणी स्वीकारली जाते. वार्षिक वर्गणी मनिऑर्डरने कुडावळ्यास पाठवावी. चेक वा ड्राफ्ट नकोत. पुण्यात वर्गणी भरण्यासाठी उज्वल ग्रंथ भांडार अप्पा बळवंत चौक येथे भरता येते. या संबंधी अधिक माहिती या अंकाच्या पान ४ वर दिली आहे. संपर्काचा पत्ता पुढील प्रमाणे.
दिलीप कुलकर्णी
संतुलन प्रकाशन, कुडावळे
तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी
पिन कोडः ४१५ ७१२